ताज्या घडामोडीदेश-विदेश

अजय तावरेला भर चौकात फाशी देण्याची मागणी

कल्याणीनगर अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य

कोल्हापूर : पुण्यातील ससून रुग्णालयाचा तत्कालीन अधीक्षक डॉ. अजय तावरे हा चुकीचं कामं करत आहे. हे रुग्णालय प्रशासनापासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांना माहीत होतं. मात्र प्रशासन ही तावरेच्या पाठीमागे उभं राहिलं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे यात सुद्धा शंका आहे. डॉ. अजय तावरेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. माझ्यावर हक्कभंग करणाऱ्याच्या मतदारसंघात जाऊन मीं तिथं स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचीही चूक आहे, पुण्यातील पब संस्कृती संपवल्यास मंत्री मुश्रीफ यांची पायावर डोकं ठेवून माफी मागेन, मात्र संशयित आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉ. अजय तावरेला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर रोज नवनवीन खुलासे समोर येत असून यामध्ये आता ससून हॉस्पिटल सोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे देखील समोर येत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे देखील या प्रकारे नाव समोर आल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे आज पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि हसन मुश्रीफ यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या बिल्डरांचा राज्य सुरू आहे. पोलीस सुपाऱ्या घेऊन कामं करतात, राज्यातून अनेक तरुण आणि तरुणी पुण्यात आपलं उज्वल भविष्य घडवण्यासाठी येत आहेत, नोकरवर्ग येतोय, मात्र पांढरपेशी वर्गाकडून पुण्यात पब संस्कृती आली, उडता पंजाब सारखं उडत पुणे अशी संस्कृती पुण्यात तयार झाली. पोलिसांनी पैसे खाऊन दोन दोन फिर्यादी लिहिल्या. एका FIR मधून त्यांना सोडून देण्यात आलं. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची दिशा योग्य पद्धतीने नेली आहे. मात्र सरकारचा दबाव येऊ शकतो, ससूनवर जें आरोप केले त्यामुळे मुश्रीफ यांना राग आला, मीं त्यांचे पाया पडून माफी मागतो. मात्र पब संस्कृती संपली पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कामं करताना मला कोणाचीही भीती वाटतं नाही, मला कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मीं घाबरणार नाही, माझ्यावर कारवाई केली तर प्रत्येक पुणेकर रस्त्यावर येईल, या प्रकरणात भाजप मला वैयक्तिक जीवनात त्रास देत असल्याचा आरोप ही आमदार धंगेकर यांनी यावेळी केला.

पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि सुरू असलेला भ्रष्टाचार याबद्दल तब्बल ३७ आयटी कंपनी पुण्यातून बाहेर गेल्या आहेत. गेलेल्या ३७ कंपन्या कोणत्या आहेत याची नावे मी आज किंवा उद्या जाहीर करणार आहे. या कंपन्या गुजरातला गेल्या आहेत का याची भीती सध्या पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्रातला कंपन्या गुजरातला नेल्या जात आहेत का यासाठी हे सर्व सुरू आहे का ही भीती देखील समोर येत आहे. राज्यात आणि देशात ज्यांची सत्ता आहे त्यांनी पुण्यासाठी केवळ ट्रॅफिक आणि पब, गुन्हेगार दिले. एकेकाळी देशाच्या वैभवात अग्रेसर असलेले पुण्याचे चित्र सध्या चांगलं नाहीये. सर्वजण केवळ तिजोरी लुटायचं काम करत आहेत, असा आरोप यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button